श्रीनिंचे ‘डोह’ व इतर लेखन वाचून या समीक्षाग्रंथाकडे वळायचे, की या समीक्षेच्या प्रकाशात मूळ लेखन वाचायचे, याची निवड वाचकाला आपल्या प्रकृतीनुसार करावी लागेल

‘डोह’ प्रसिद्ध होऊन आता पंचावन्न वर्षं झाली तरी तो आजही आपल्या मंद दरवळाने मराठी साहित्यविश्व सुगंधित करत आहे. त्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे स्मरण म्हणून संकल्पित केलेल्या त्यावरील समीक्षेच्या संकलनाचे ‘डोह : एक आकलन’ हे देखणे पुस्तक अलीकडेच वाचकांच्या हाती पडले आहे. मराठीतील ललित गद्याच्या शिखरस्थानी असलेल्या ‘डोह’च्या मानमरातबाला साजेशी देखणी निर्मिती आणि त्या रूपाला शोभेल असेच त्याचे अंतरंग आहे.......